'शाहीर'! भाग- तीनक्रमशः.... "...मिरजतलं नाटक झालं आन् गावोगावच्या कार्यक्रमासाठी सुपाऱ्यांचा ओघ सुरू झाला. गणेश चतुर्थीनिमित्त मिरजेत कार्यक्रम झाला आन् पुढच्याच महिन्यात दसऱ्याला घरणिकीच्या कार्यक्रमाची सुपारी आली. दसऱ्याला घरणिकीला रात्री कार्यक्रम झाला आणि दुसरी दिवशी सकाळी तिथंच त्या गावच्या लोकांनी जमून ठरवलं, की प्रत्येक वर्षी दोन खेळ करायचे. यात्रंला आणि दसऱ्याला, असे पुढच्या सलग दहा वर्षांसाठी करार करायचा आणि तो करार केला सुद्धा. आमच्या मनात सुरवातीला धाकधूक होती, की आमचं बेभरवशाचं कलापथक; दहा वर्षांसाठी करार कसा करावा! पण जे व्हायचं हाय ते होऊदे, असं ठरवलं आणि काम करत राहिलो.