'शाहीर'!क्रमशः..... भाग- २"...या नाटकात मी नवरा, रामभाऊ कंडक्टर(रामभाऊ मोरे- यांना उत्तम प्रवचनकार म्हणून ओळखतातच, पण ते आटपाडी एस. टी. डेपोमध्ये कंडक्टरची नोकरी करत होते, त्यामुळे जास्त करून त्यांना लोक 'रामभाऊ कंडक्टर' या नावानेच ओळखतात.) यांनी माझ्या बायकोचं म्हणजे बाळाच्या आईचं काम केलं होतं. बंडातात्या सासरा आणि राजाभाऊ सासू अशी चार मुख्य पात्रं होती. या पात्रांभोवती नाटकाचं कथानक फिरत रहायचं. रामभाऊंनी बाळासाठी वेडी झालेल्या-आईचं काम इतकं एकरूप होऊन केलं होतं, की लोकांच्या मनातून वेड्या आईची छबी जाता जात नव्हती. काही लोकं अजूनही सांगतात, 'ज्यांनी नाटक बघिटलंय, ते झोपेत सुद्धा चावळत उठायचे-' तिचं बाळ, तिला परत द्या.' म्हणायचे...बाहेर