जल तू ज्वलंत तू! - 6

  • 6.2k
  • 2.4k

6 ------------ ऋतू बदलला होता. कडाक्याची थंडी पडली होती. बफलोचे तापमान शून्य डिग्रीच्या बरेच खाली गेले होते. जसे भारतीय लोक विहिरीतून पाणी घेण्यासाठी पायर्‍या उतरत जातात, जसजसे धरतीच्या गर्भात पाय जातात तसतशी थंडी वाढतच जाते. तेथील नद्या, सरोवर बर्फाच्या लाद्या झाल्या होत्या. हिरवी पानं पांढरी दिसू लागली होती. झाडांनी वेगवेगळी रूपं घेतली होती. आकाश पृथ्वीवर पाणी नाही, बर्फ टाकत होते. रस्त्यावर एखाददुसरा माणूस फिरताना दिसत होता. प्रवासीसुद्धा जे धाडसी होते तेच फिरत होते. फिन्जान आणि पेरिनाने डेलाला तिच्या खोलीत पाठवले. त्यांनी अंथरुणावर कागदाच्या लहान लहान पिशव्या पसरल्या. या पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पन्ना होते. पेरिनाला ते फार प्रिय होते. अनेकवेळा मोजून