जल तू ज्वलंत तू! - 5

  • 5.7k
  • 2.6k

5 ----------------- त्यादिवशी वॉशिंग्टनमध्ये फारसे ऊन नव्हते. तिथे रात्री नऊ वाजता सूर्य मावळत असे. आज संध्याकाळी ढगाळ वातावरणाने सूर्य लवकर मावळल्यासारखे वाटले. व्हाईट हाऊसच्या समोरच्या प्रशस्त लॉनमध्ये फिरणार्‍यांची रहदारी नेहमीसारखीच होती. एकीकडे तरुण आणि मुलांच्या घोळक्यात तर जणू जत्रा भरली होती. लोक कुतुहलाने त्या लहानशा ब्राजिलियन वंशाच्या कुत्र्याला पाहत होते. त्याला कोणीतरी दारू पाजली असणार. तो दोन पायांवर नाचत होता. त्याच्या गळ्यात बांधलेला सोनेरी स्कार्फ ध्वजासारखा लहरत होता. त्याला पाहून टाळ्या वाजवणार्‍या लोकांमध्ये मुलंच नाही तर त्या कुत्र्याची मालकीण मॉमग्रेटा पण सामील होती. तिच्याबरोबर न्यूयॉर्कहून आलेली तिची मैत्रीणपण होती. थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या फोटोग्राफरने हे दृश्य कॅमेरात कैद करणे सुरू