जल तू ज्वलंत तू! - 3

  • 5.7k
  • 2.4k

3 --------------- रात्र बरीच झाली होती. मुलांच्या आई-वडिलांना आश्चर्य वाटत होते की, रोज लवकर झोपणारी मुले आजोबांची गोष्ट ऐकण्यात इतकी तल्लीन झाली की, दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र झाल्याचे त्यांना जाणवले नाही. फिन्जानच्या कथेचा शेवट जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यामुळे कोणाला भूक-तहान आठवली नाही. मुलांनी आणि आई-वडिलांनी काही वेळेपूर्वी बफलो नगरात हिंडून फिरून त्या सगळ्या जागा पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटत होते, त्यांच्यासमोर ती घटना घडली आहे. गोष्ट संपल्यावर आजोबांच्या लक्षात आले की, त्यांच्या पाहुण्यांनी दुपारपासून काही खाल्ले नाही. तेवढ्यात दार उघडले. भारतीय परिवाराला तिथे सोडणार्‍या दोघी बहिणी आल्या. त्या जवळच फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांच्या हातात मोठी टोपली होती.