जल तू ज्वलंत तू! - 2

  • 6.4k
  • 3.3k

2 ------------- आजोबांकडून सोमालियाच्या फिंजानची कहाणी ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले होते. फिंजान लहानपणापासून नायगारा धबधबा पाहत होता. तो त्या धबधब्याकडे असा मन लावून बघायचा जशी लहान मुलं सिनेमा किंवा टी.व्ही. बघतात. पडणार्‍या पाण्याचा तो दैत्याकार पडदा त्याला भिजलेल्या रजतपटासारखा वाटत असे. तो त्याला फार आवडत असे. फिंजानचे वडील अमेरिकन सैन्यात तैनात होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावरसुद्धा त्याने तिथे येऊन बसणे सोडले नव्हते. फिंजानच्या आईची-रस्बीची इच्छा होती की, आता फिंजानने सैन्यात भरती व्हावे. पंधरा वर्षांच्या फिंजानला मनात नसताना आईचे म्हणणे मान्य करावे लागले. इतरांच्या इच्छेला माणूस मान देतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. पण हे तो आयुष्यभर करू शकत नाही. फिंजान लपूनछपून