आर्थिक व्यवहार

  • 9.4k
  • 2
  • 2.5k

आर्थिक व्यवहार अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून विराजने आपला फर्निचरचा व्यवसाय भरभराटीस आणला होता. काहीच दिवसात तो शहरातील एक नावाजलेला व्यावयायिक म्हणून सर्वांच्या परिचयाचा झाला होता. प्रेमळ स्वभाव व आपल्या गोड बोलण्यानं तो ग्राहकांचे मन लगेच जिंकायचा. एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू घ्यायची नसली तरी त्याच्या बोलण्याच्या जादूनं ती वस्तू तो ग्राहक विकत घ्यायचा. यामुळे त्याचा व्यवसाय अगदी कमी कालावधीमध्ये भरभराटीस आला होता. एके दिवशी त्याचा मित्र धनंजय बऱ्याच दिवसाने त्याच्या दुकानावर आला. खूप दिवसांनी मित्र भेटल्यामुळे विराजला खूप आनंद झाला. त्याने लागलीच स्पेशल चहा मागवला. थोडावेळ जुन्या आठवणीतील गप्पा निघाल्या.दोघेही जुन्या आठवणीत रमून गेले. थोडया वेळाने धनंजय म्हणाला,