क्रांतिवीरांगणा - हौसाताई मोरे पाटील

  • 8.6k
  • 2.8k

*क्रांतिकन्या, क्रांतिवीरांगणा हौसाताई मोरे पाटील.*१८५७ हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील दुसरे पर्व. या पर्वात सातारा येथे काही क्रांतिकारकांनी बापू रंगोजी गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याची मोहीम आखली, पण ऐनवेळी ही मोहीम उघडकीस आली आणि या मोहिमेत सहभागी असणाऱ्या १७ क्रांतिकारकांना ८ सप्टेंबर १८५८ रोजी इंग्रजांनी क्रुर सजा सुनावली गेली. त्यात काहींना फाशी, काहींना तोफेच्या तोंडी आणि काहींवर गोळ्या झाडल्या गेल्या. याच उठावातील १७ क्रांतिकारकांपैकी एक थोर क्रांतिकारक नाना रामोशी यांच्या अस्थी त्यावेळी कुंडल या गावी आणल्या गेल्या. त्यांची समाधी एका झाडाखाली कट्ट्याच्या स्वरूपात आहे, पण काळाच्या ओघात लोकांना त्यावेळी केलेल्या महान क्रांतिकार्याचा विसर पडलेला दिसतो, 'क्रांतिकारकांचे क्रांतिकार्य विस्मृतीत जाणे, म्हणजे