मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 13

  • 7.9k
  • 1
  • 3.8k

पुढे... किती अजब असतं ना पहिलं प्रेम..!! एका जादुई पण अनामिक नात्याची सुरुवात तर होते, पण त्याचा अंत कधीही लिहिलेलाच नसतो नियतीने...हं, आता हे फार उशिराने कळतं, ही गोष्ट वेगळी...आणि तेही कळतं फक्त, वळत काही नाही...कोवळ्या वयात निर्माण झालेल्या भावना म्हणजे एक कोडंच...! हे जे पहिलं प्रेम असतं ना, ते ओठांवरती मंद मंद स्मित निर्माण करतं, पण खळखळून हसण्याची परवानगी यात नसते...पहिल्या पावसाआधी शीतल वारा वाहत असताना उन्हाची दाहकता जशी कमी होते तसंच पहिल्या प्रेमात होतं, पण जेंव्हा हा पाऊस धोधो कोसळत असतो तेंव्हा, कोणाला सांगून यात भिजण्याची परवानगी मागता येत नाही...गुपचूप त्या पाण्याचे थेंब अलगद खिडकीतून हात बाहेर काढून