मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 12

  • 8.6k
  • 1
  • 3.8k

पुढे... आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याशी न बोलणं हे किती जीवघेणं असतं याची प्रचिती मला येत होती...मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही वेळ शोधत होतो आणि जेंव्हा वेळ आली तेंव्हा मात्र भावनांची एवढी ओढाताण झाली की केवळ रागच व्यक्त झाला...मनाच्या चक्रव्यूहात अडकल्यावर खूप धडपड होतं असते प्रेम व्यक्त करण्यासाठी.. पण चक्रव्यूह ना ते...!! सहजासहजी त्यातून बाहेर कसं पडता येईल..?? आणि कॉलेजमध्ये उगाच चर्चेला उधाण येवू नये, मनीचे भाव जगाला उमजू नये यासाठी काही ठराविक वेळीच बोलण्याचं प्रयोजन करायचो आम्ही अणि त्यात ही अशी डोक्याला मारून घ्यायची वेळ यायची... "जीस दिन सोचते है, आज पुरी बात करेंगे, 'झगडा' भी कहता है, हम भी