पाऊसः आंबट-गोड! - 3 - अंतिम भाग

  • 9.6k
  • 3.3k

(३) चहा घेत असताना पुन्हा पावसाचा जोर वाढला. मी तात्यांना विचारले,"तात्या, घरी सांगून आला आहात ना? नाही तर वहिनी...""कसे आहे सांगून आलो तरी उशीर झाला म्हणून आगपाखड आणि नाही सांगितले तर मग काय रौद्ररूप..."मी म्हणालो, "तात्या, तुम्ही बालपण आणि विद्यालयीन जीवनातील पावसाच्या आठवणी सांगितल्या. तुम्ही शिक्षक होता. या काळातीलही काही आठवणी असतीलच..."" हो ना. निश्चितच आहेत. शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. नोकरीचे गाव एक आडवळणी खेडे होते. म्हातारी आई आणि तरुण बहिणीला घेऊन त्या खेड्यात राहणे शक्य नव्हते म्हणून मग तालुक्याच्या ठिकाणी घर केले आणि इतर दोन शिक्षकांप्रमाणे मीही सायकलवर जाणे-येणे करु लागलो. चौदा किलोमीटरचे अंतर तोही कच्चा, खडकाळ रस्ता! अशा