बळी -- २४ बंद कपाटातून पैसे आणि दागिने कोणा अज्ञात व्यक्तीने पळवले आणि चोरीचा आळ मात्र आपल्यावर आला; हे ऐकून केदारचे डोळे संतापाने लाल झाले होते. आपल्या पाठीमागे आपली एवढी मोठी बदनामी झाली -- या विचारानेच त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. एवढा मोठा कालावधी गेल्यानंतर तो स्वतःला निरपराध सिद्ध कसा करू शकणार होता? "बंद कपाटातला ऐवज कोण घेऊ शकतो?" --- तो स्वतःशीच