जानू - 20

  • 8.9k
  • 1
  • 3.8k

जानू आज खूप खुश होती..इतकी सुंदर पहाट ..तिला सर्वच छान आणि सुंदर वाटत होत ..वाटणारच ..प्रेमात पडलं की असंच होत ना..कधी कॉलेज ला जाईन आणि कधी समीर ला पाहू अस झालं होत तिला..चेहऱ्यावरचं हसू तर एक मिनिट ही थांबत नव्हते..आज ची जानू जरा जास्तच वेगळी आणि सुंदर दिसत होती..प्रेमाची लाली जी चढली होती गालावर तिच्या..ती कॉलेज मध्ये पोहचली ..समिधा ला तिला पाहून आश्चर्य वाटत होते काल पर्यंत तर किती शांत आणि आपल्याच विचारात दंग होती ..किती वेळा विचारल तरी काही सांगितलं नाही तिने ..आणि आज मॅडम एकदम इतक्या खुश ..या मुलीचं काही कळतच नाही.. मला तर समिधा विचार करत होती