श्वास असेपर्यंत - भाग १२

  • 6.6k
  • 2.6k

आई मला पाहताच तिला गहिवरून आलं. पण तिने आपले अश्रू लपवत, अरे अमर , " अचानक कसं काय तू येण केलं ????" बाबा भिंतीला टेकून चिंतातुर विचारात मग्न होते. " सहज आलो आई. तुमची आठवण जास्त येऊ लागली, म्हणून मी आलो !" असं मी उत्तर दिलं. शेवटी जन्मदात्री असल्याने तिने सर्व ओळखुन घेतलं . पण सध्या बोलणे योग्य नाही , म्हणून ती म्हणाली " ठीक आहे " . बाबांच्या पायाची, जखमेची थोडी विचारपूस करुन आईने गुळाचा चहा केला होता तो पिऊ लागलो . मग आई लगेचं स्वयंपाक करायला बसली.आम्ही म्हणजे बाबा व मी बसलो इकडच्या तिकडच्या गोष्टी