वाचलास रेsssss वाचलास ! - 9 - शेवटचा भाग

  • 12.9k
  • 1
  • 5k

"सायब जरा इचार करा, काय बी लिवू नका. ती तुम्हाला हात लावू शकत नाय, काय तरी ताकद हाय तुमच्यात. नायतर तीनं आत्तापर्यंत तुम्हाला मारलं बी असत नाय." कोपऱ्यात फटफटीच्या तुकड्यांच्या मागे घाबरून लपलेला बन्या उठून उभा राहिला होता. ढाब्यावर स्टोव्ह पेटवण्यासाठी वापरत असलेले लायटर खिशातून काढून त्याने ते पेटवले होते. काय समजायचं ते अभिमन्यू समजला होता. डोक्याला एक हिसका देत त्या विकृत भुताने आपला मोर्चा बन्याकडे वळवला. आणि तेवढीचं संधी साधून अभिमन्यूने उर्वरित कथा खरडायला सुरुवात केली होती. काही वेळापूर्वी फटफटीमागील खिशात ठेवलेला बाप्पाचा तो फोटो चाचपडत अभिमन्यूने त्याला हातात घेतले. एका हाताने लेखणी सुरु होती. डायरीवर भराभर अक्षरे उठू