मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 9

  • 8.1k
  • 1
  • 3.7k

पुढे... न बोलवता, न सूचित करता आपल्या आयुष्यात येऊन धडकणारं वादळ म्हणजे प्रेम...!! आणि त्यामुळेच या जगातलं सगळ्यांत कठीण काम आहे कोणावर प्रेम करणं...एकदा का प्रेम नावाच्या भावनेने आपल्या आयुष्यात प्रवेश केला तर ते आपल्याला सगळ्यांमध्ये असतांनाही, सगळ्यांपासून दूर करून ठेवतं....सगळे सुटून जातात पण प्रेम मात्र शेवटपर्यंत सोबत असतं, मग ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो सोबत असो किंवा नसो...मी आणि अतुल एकमेकांसोबत तर राहिलोच नाही, पण एकमेकांपासून दूर जाण्याच्या हट्टाने मात्र सगळ्यांपासून लांब गेलो... चेतन...माझ्या आयुष्यातील सगळ्यांत खास मित्र, नेहमीच माझी साथ देणारा, माझ्या कठीण परिस्थितीत मला मानसिक आधार देणारा आणि अतुलचा जिवलग भाऊ...तो आमच्यामुळे आमच्यापासून दुरावला...आता विचार केला तर