पावसाळा सुरू झाला होता. एक-दोन पाऊस सुरुवातीला चांगले झाले होते. पहिल्या पावसाने सर्व बाजूला मातीचा सुगंध दरवळत होता. पक्षी चिवचिव करत होते , कुणी पक्षी आपली घरटी बांधण्यात गुंतून पडले होते , मध्येचं सुर्यासमोर ढग येऊ तो सूर्य ढगांमध्ये लपून जायचा. मग सर्व बाजूला अंधार व्हायचा. त्यामुळे काळीभोर जमीन अधिक काळी दिसत असायची. उन्हाळ्यात शेतीची मशागत नांगरणी, वखरणी झाल्याने फक्त आता पावसाची वाट होती. ती वाट या पावसाने संपली होती . काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता . जिकडे तिकडे कालवाकालव सुरू झाली . शेती शेतीसाठी बियाणे आणण्याची शेतकरी तयारी करत होतो . कुणी आपल्या घरावर