श्वास असेपर्यंत - भाग १०

  • 7k
  • 2.9k

अरे अमर , " मित्रांमध्ये चर्चा करतांना हा आवाज माझ्या कानी पडला. आवाज तर ओळखीचा वाटत होता. पण तो मुलीचा असल्याने मी दुर्लक्ष केलं. असेल म्हटलं दुसरा कुणी तरी अमर." परत जवळ आल्यावर अरे अमर , " मी लक्ष्मी तुझ्या गावची . ओळखलं नाही का मला ?????" ती जवळ आल्यावर मी तिला ओळखलं, की ही तर आमच्या गावच्या पाटलांची लक्ष्मी होती. बाबा ज्यांच्याकडे नेहमी कामाला असायचे त्याचं पाटलांची ती कन्या होती लक्ष्मी. बहुतेक चार - पाच वर्षे झाली असतील तिला न पाहून. गावात दहावीच्या निकालाच्या वेळी पेपर चाळत असतांना तिच्याशी तोंडओळख आणि अधून - मधून नजरभेट व्हायची. " आजही