आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ६

  • 7.6k
  • 3.2k

निशिकांतने ऋषभसोबतच ऋचाकडे जाण्याचा निर्णय घेतला. घरी पोहोचताच त्याने ऋचाला ऋषभने जे काही सांगितल त्याबद्दल विचारल. ऋचाने जे घडलं ते सर्व सांगितलं निशीकांतला, पण ती हे नाही सांगू शकली की तिने आधी का नाही सांगितलं हे त्याला. ऋचा इतकंच म्हणाली की नको थांबूस तिच्यासाठी तिला जर तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर तिने इतक्या वर्षात कमीतकमी एकदा तरी कॉनटॅक्ट केला असता. कदाचित ती तुला आणि मलाही म्हणजे आपल्याला विसरलीही असेल. निशिकांतच डोकं खरंतर खूप दुखायला लागल होतं. त्याला ऋचा जे सांगत होती ते पटत होतं, पण मन ऐकायलाच तयार नव्हतं. तिने असं सोडून जायला नको हवं होतं; हाच