बळी - २२

  • 10.9k
  • 1
  • 5.3k

बळी - २२केदारच्या अपहरणानंतर रंजना काटेगावला गेली; आणि त्यानंतर एकदाही घरच्या माणसांना भेटायला घरी आली नाही; असं मीराताई म्हणाल्या; तेव्हा इन्सपेक्टरना मोठं आश्चर्य वाटलं! केदारने तिच्याविषयी जो विश्वास दाखवला होता, त्याच्याशी तिचं हे वर्तन सुसंगत नव्हतं. त्यांनी मीराताईंना प्रश्न विचारला, "फोनवर तिच्याशी बोलणं होत असेलच! ती धक्क्यातून सावरली की नाही? किती दिवसांचा कोर्स आहे --- इकडे परत कधी येणार आहे --- काही कळवलं का तिने?" इन्सपेक्टरच्या या प्रश्नावर मीराताई म्हणाल्या,"नाही! तिच्याशी माझं बोलणं झालं नाही! तिच्या घरी अनेक वेळा फोन केला,