भावनांचा खून साधारण ३० वर्षांपुवीची गोष्ट. केरळ मध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार आपले पाय झपाटयाने रोवत होता. त्यातच केरळची राजधानी कोचीन येथे एक देशाला हादरवणारी घटना घडली. पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने सांगितले की, कॉन्व्हेंटमध्ये एक खून झाला आहे. पोलिसांनी लगेचच त्या कॉन्व्हेंटमध्ये धाव घेतली. तेव्हा ती बॉडी पाहता त्या प्रेताच्या चेहऱ्यावर आरोखडे आणि पूर्ण बॉडी रक्ताने माखली होती.आणि ती बॉडी पंखायला लटकत होती. तेव्हा पोलिसांनी तिथे राहणाऱ्या सर्व लोकांना बोलवून घेतले. त्या व्यक्ती बद्दल काही माहिती मिळते आहे का? जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच कॉन्व्हेंटची मॅनेजर सिस्टर रोझीने तिच्याबद्दल माहिती देण्यास पुढाकार