८ जाणता राजा “राजन्, क्षमा असावी, अशा ऐरणीच्या प्रश्नावर सारी राज्यसभा थांबली असताना आपणास असं तातडीने आत बोलावून घेतलं. पण मलाही तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. ही सतीची वस्त्रं आणली होती. युद्धावर जाण्यापुर्वी आपणच सर्व राण्यांना ती बहाल करावीत.” “हा काय प्रकार आहे राणीसरकार? तुमच्या सारख्या सुजाण राणीस हे असे अविचारी वागणे शोभत नाही. आम्हास विजयतिलक करावयाचा सोडून तुम्ही सतीची वस्त्रे मागवलीत? धिक्कार असो. तुम्हीच अशी इथे हार मानलीत हे सर्वोपकर्णी झाले तर सैनिकांचं मनोधैर्य कसं खच्ची पडेल हे आम्ही तुम्हास सांगण्याची गरज का पडावी परम? “ “खरय राजन्, माझं हे वागणं आपल्याला आततायी पणाचं वाटणं साहाजिकच आहे पण