लघुकथाए - 5 - नि:शब्द

  • 8k
  • 1
  • 3.1k

६ नि:शब्द लाजाळूची पानं एक एक करत मिटत गेली सईच्या नाजूक बोटांच्या स्पर्शाने. मिटता मिटता त्यांच्या कडून आलेली आनंदाची लहर सई आणि तिच्या अवती भवती रुंजी घालणाऱ्या इवलुशा पिवळ्या फुलपाखरापर्यंत पोहोचली. फुलपाखराचे पंख किंचित वेगाने फडफडले आणि सईच्या गालांवरची खळी अधिक खोल झाली. दंग्या बाजूलाच झोपलेला. ती लहर तशीच पुढे त्यालाही स्पर्शून गेली आणि जराशी मान उचलत त्याने शेपूट हलवली. मग सईने हळूच गवतफुलाला कुरवाळलं आणि परत एकदा तशीच आनंदी लहर वाऱ्यालाही सोबत घेवून सभोवतालच्या झाडा पानांवर अलगद पसरली. हलकेच पानांच्या टाळ्या वाजवून त्यांनी तो आनंद व्यक्त केला. सई, आनंदी बाईंची पाच वर्षांची पोरकी नात. मुलगा व सून