राधिका

  • 12k
  • 4.6k

सकाळपासूनच राधिकाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. संपूर्ण रात्र ती वेदनेने विव्हळत होती. आजपर्यंत इतके रडून रडून आता तिच्या डोळ्यातले अश्रू देखील संपले होते. रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पांघरून तिला झोप लागली. सकाळी जाग आली आणि पुन्हा या नरकात असल्याची जाणीव होताच ती घाबरली. दारावरची कडी उघडून तो कधीही आत येईल आणि एखाद्या जनावराला मारावे इतक्या क्रूरपणे पुन्हा मारहाण करेल, त्याचा तो त्याच त्याच प्रश्नांचा भडिमार सुरू होईल आणि पुन्हा सारे तेच ते आणि तेच ते! राधिका आता या रोजच्या मरणाला कंटाळली होती. या त्रासातून आणि जाचातून तिला कायमचे सुटायचे होते. यावर आत्महत्या हाच उपाय तिला दिसत