आरोग्यम धनसंपदा

  • 13.8k
  • 1
  • 3.8k

मुलगी पहायला जाण्याची ही वैभवची सोळावी वेळ होती.आई-वडील व आपल्या जवळच्या मित्रासोबत तो आज नगरला मुलगी पहायला आला होता.जेवण झाल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी इतकी विलक्षण सुंदर होती की,तिच्यापुढे सुंदर हा शब्दही फिका पडावा. पौर्णीमेच्या पूर्ण चंद्राचे तेजही तिच्या मुखचर्येवरील तेजापेक्षा गौण भासावे.तिचे गुलाबी ओठ, मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात, रेखीव भुवया, चाफेकळी नाक व गौर वर्ण हेच तिचे सौंदर्य अलंकार होते. या सौंदर्याला नजर लागु नये म्हणूनच की काय, देवाने तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर ओठांच्या खाली काळया तिळाची मोहर उमटवली होती.तिचा साचेबद्ध,रेखीव बांधा तिच्या दैवी सौंदर्यात आणखीनच भर घालत होता. म्हणूनच वैभव तिला पाहिल्यापासून बेचैन झाला होता. चप्पलच्या निर्मीतीची मोठी