आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ४

  • 8.3k
  • 3.4k

आईने जेंव्हा जुईबद्दल ऐकल तेंव्हा का कुणास ठाऊक तिला असं वाटल की हे नाव तिने आधी घरातच ऐकलय कुणाकडून तरी, पण कुणाकडून हे तिला आठवेना. आणि निशिकांतने इतका मोठा निर्णय घेतला आणि ती याबद्दल अनभिज्ञ होते, या विचारांमुळे जुई बद्दल तिने जास्त विचार केला नाही; पण कदाचित तिला असं वाटून गेलं की ऋचा जास्त माहिती देऊ शकेल या बद्दल. म्हणून तिने ऋचाला विचारावं असं मनाशी ठरवलं निशिकांतची समजूत घातली खरी पण जास्त काही न बोलता. निशिकांतचा एव्हाना थकल्यामुळे डोळा लागला आणि आई देखील त्याच्या अंगावर पांघरून घालून तिच्या रूम मध्ये निघून गेली. पण तिच्या डोक्यातील विचारांची शृंखला काही