वाचलास रेsssss वाचलास ! - 3

  • 13k
  • 1
  • 6.6k

'त्या नदी घाटावर आजूबाजूचा कानोसा घेत मी गाडीला किक मारली, ती काही केल्या स्टार्ट होईना. बरेच दिवस पावसात भिजल्याने तिची अवस्था खूप वाईट झाली होती. सात वर्षे झाली, माझ्या स्वकमाईतून घेतलेली पहिली गाडी. असा कसा वाऱ्यावर सोडेन मी तिला. डिकी चेक करून आधी माझी डायरी उचलली. माझी डायरी, तिच ज्यामध्ये मी कथा लिहितो. माझ्या [अजरामर] कथा. मी लिहितो, मग वेबसाईटला पब्लिश करतो, आणि मग त्याच भयकथा कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यच वाटोळं करतात. अगदी नायनाट....आणि सुरु होतो लपंडाव. मी, माझी कथा आणि या सगळ्याच्या मागे लागलेली मीडिया, माझ्या कथेसारखीच घटना आयुष्यात घडून आयुष्याची फरफट झालेला एखादा अभागी