गावा गावाची आशा - भाग ४

  • 6.3k
  • 2.9k

पीएचसीला मासिक मीटिंग उरकून पूजा आणि अंकिता दोघी सोबत घरी चालल्या होत्या. चालता चालता त्यांना एक ओळखीची अंगणवाडी सेविका भेटली. तिच्याशी बोलून झाल्यावर त्या दोघी पुन्हा रस्ता चालू लागल्या.थोडे फार पुढे चालून गेल्यावर त्यांना गावातली एक बाई भेटली. ती म्हणाली.ही पूजा कधी चालणार हळूहळू. मी जाते बाई पटापट निघून..तू रहा बाई हिच्या सोबत चालत . तुला बरं होईल.या पूजाच्या पायामध्ये जोरच नाही .ती बाई बोलली. . मी जाते. ती बाई निघून गेली. ते ऐकल्यावर पूजाचा चेहरा फारच केविलवाणा झाला.पूजा त्या बाईच्या बोलण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस.ती बाई आहेच तशी फटकळ तोंडाची. तु चाल सवडीने... काय टेन्शन नाही .अंकिता तिला बोलली.