आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ३

  • 7.7k
  • 1
  • 3.7k

या तिच्या छोट्याश्या कॉलेज विश्वात फक्त ऋचा तिची सर्वात जवळची मैत्रीण होती जिला जुई बद्दल सर्वकाही माहीत होत आणि जुईला देखील ऋचाबद्दल. पण अर्ध वर्ष संपत आल होत तरी जुईला निशिकांतबद्दल ऋचाने कधी काही सांगितल नव्हत कारण तशी वेळच आली नव्हती कधी. पण दिवाळीला जुई आणि निशिकांतची अचानक भेट झाल्यावर मात्र ऋचाने निशिकांत बद्दल जुईशी बोलायला सुरुवात केली. कारण तिच्या प्रिय मित्राने म्हणजेच निशिकांतने तिला मैत्रीची गळ घालून विंनती केलेली की जुईशी ओळख करून देशील. ऋचा तेच प्रयत्न करत होती मात्र हळूहळू तिच्या लक्षात यायला लागल की जुईला यात काहीही रस नाहीये, त्यामुळे ऋचाने निशिकांतला तसं