मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 4

  • 8.5k
  • 4.1k

पुढे... अनपेक्षितपणे आपली अपेक्षा पूर्ण झाली तर??? कसं वाटेल??? अरे...हे काय विचारानं झालं का?? असं झालं तर आपण अगदी 'सातवें आसमान' वर पोहचून जाऊ...हो ना...!! होतं असं... माझ्यासोबत ही त्यावेळी तेच झालं...दोन वर्षांपासून माझं आणि अतुलचं 'आंधळी कोशिंबीर' खेळणं सुरू होतं...त्यात एकमेकांना दोन वर्षांपासून पाहिलं ही नव्हतं, आता त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल याची अपेक्षा होती...शेवटी आता मी आणि अतुल एवढ्या मोठ्या कालावधी नंतर एकमेकांच्या समोर येणार होतो...हळुवार उलगडणाऱ्या नात्यांची गुंतागुंत सोडवणं फार कठिण असतं...त्यात समोरचा आपल्याबद्दल काय विचार करत असेल, आपलं वागणं, आपलं बोलणं त्याला कसं वाटत असेल हे विचार सतत डोक्यात असतात आणि त्यात त्यांचं अव्यक्त राहणं मात्र आपल्याला