१९. दिलदारचे नवे पत्र दिलदारने अधीरतेने पत्र उघडले. चिठ्ठीत काय असेल? आयुष्यात आलेले हे पहिलेच पत्र. तेही प्रेमपत्र. कजरीने काय लिहिले असणार? कजरीने दिलदारच्या चार शब्दांचे उत्तर.. चार शब्दांतच दिलेले! मजकूर इतकाच.. 'आज तिकडे भेटायला ये..' इतकेच! तिलाही ते दिलदारचे पहिले पत्र वाचून असेच वाटले असेल.. बास? इतकेच? परतल्यावर त्याने समशेरला चिठ्ठी दाखवली.. समशेर कागद उलटापालटा करत म्हणाला,"काला अक्षर भैंस बराबर. आणि अशी दुसऱ्यांची प्रेमपत्रे वाचण्याची पद्धत नाही माझी!" दिलदार विचार करत होता.. एका दिवसात किती गोष्टी घडाव्यात.. गुरूजींशी भेट.. त्यात शरणागतीबद्दल बोललेले.. मग कजरीशी भेट नि तिचे पहिलेवहिले प्रेमपत्र.. तिला प्रत्यक्ष दिलदार म्हणून भेटायचे.. सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लवकरच लागणार..