दिलदार कजरी - 18

  • 5.7k
  • 2.2k

१८. कजरीचे दिलदारला पत्र! दिलदार रात्रभर विचारात होता, मास्तरांनी भेटायला का बोलवावे यापेक्षा त्यांनी कजरीला पत्र का लिहिले नि त्यात काय लिहिले असावे? ते त्यांना भेटूनच कळणार होते. पण कजरीच्या बोलण्यात आलेला दिलदार शब्द? तो असंच आला की मुद्दाम? तिला डाकूंच्या टोळीची भीती वाटते तर तिला सारे ठाऊक असेल तर ती अशी शांत कशी? समशेरला न सांगता दिलदार हरिनामपुरात पोहोचला. मास्तर घरात वाट पाहात बसलेले .. "ये. आलास. छान." "तुम्ही बोलावले गुरूजी?" "अरे हो. तुला बोलवायचे. पण तुला निरोप कसा देणार. मग कजरीबेटीला पत्र लिहिले." "ती म्हणाली मला. पण.." "काळजी करू नकोस.. कजरीला मी जे सांगायचे ते सांगितलेय.. तू फक्त