दिलदार कजरी - 17

  • 6.1k
  • 1
  • 2.7k

१७ मास्तरांचे कजरीला पत्र! मग दोघे घोडेस्वार दूरच्या रस्त्याने निघाले. इकडे सकाळचे घोडेस्वार परत येतीलच म्हणत कजरी आपल्या माडीवर वाट पाहात बसलेली.. .. ती पार संध्याकाळपर्यंत.. तिला दुसरीकडून सायकलवरून येणारा दिलदार डाकिया दिसेपर्यंत. ती झटकन नदीकिनारी आपल्या खडकाकडे निघाली. "काय म्हणाले हरिनाथ गुरूजी?" "ठीक आहेत म्हणाले. बरी आठवण काढलीस म्हणत होते .. पण त्यांनी चिठ्ठी नाही दिली काही.." "आणि माझी चिठ्ठी?" "ती दिली.." "ती नव्हे. चार शब्दी चिठ्ठी .." इथे अखंड सावधान असणे कसे जरूरी आहे याचा प्रत्यय आला दिलदारला. ही चार शब्दी चिठ्ठी म्हणजे काय हे ठाऊक असण्याचे त्याला कारण नव्हते .. साळसूदपणे तो म्हणाला, "म्हणजे?" "तुम्हाला ठाऊक नाही?"