दिलदार कजरी - 14

  • 5.8k
  • 1
  • 2.5k

१४. पुनर्भेट "यार समशेरा, माझा विश्वास बसत नाही हे सगळे घडले त्यावर.. म्हणजे मी खरोखरच ज्योतिषी बनून गेलो नि कोणाला संशय न येता सगळे काम करून आलो.. आणि कजरी भेटेल असे शेवटपर्यंत वाटत नव्हते. ती भेटली अगदी शेवटी. आणि महत्त्वाचे म्हणजे ती पण पोस्टमनची वाट पाहाते आहे.." "पण तिला कदाचित तो पोस्टमनच आवडला असेल तर?" "तर? आयुष्यभर पोस्टमनच्या वेशात सायकलीवरून फिरत राहीन.. तू कहे अगर जीवनभर सायकल चलाता जाऊं.. उद्या पोस्टमनचे काम परत आहे.." "मग तुझे ज्योतिषी बनण्याचे सगळे सामान देऊन येतो परत.." "नाही दोस्त नाही. पुढे कधी कशी गरज पडेल सांगता येत नाही. सगळे साहित्य हाताशी असलेले बरे.. सध्या