दिलदार कजरी - 13

  • 5.8k
  • 1
  • 2.3k

१३ सब्र का फल! आता काय करावे? दिलदार पेचात पडला. जिच्यासाठी तो आला ती पुजारी कन्याच नसावी? पण हे कसे शक्य आहे? आजवर कित्येकदा तिला इकडे पाहिलेले.. पुढे घोडे दामटत दिलदार म्हणाला, "लीलाको बुलाएंगे तो.. हम चेहरा देखकर बता देंगे.." लीला बरोबर कदाचित ती धाकटीपण यायची.. ती आपलीवालीच असेल तर नाव काही का असेना तिचे.. नावात नाहीतरी आहे काय? "लीला? ती तर पाठराखीण म्हणून गेलेली. आली होती. पण परत गेलीय. येईल आठवड्यात.." म्हणजे त्याचीवाली धाकटी पण कदाचित त्या भलीथोरलीच्या घरी, थोरलीच्या पाठोपाठ गेली असणार .. की इकडेच घरात बंद करून ठेवलीय तिला? "वैसे फोटो देखकर भी भविष्य बताते हैं हम..