दिलदार कजरी - 12

  • 5.6k
  • 1
  • 2.3k

१२ आचार्य! आज सकाळी दिलदार उठला.. चार दिवस मध्ये उलटून गेलेले. आता तो ज्योतिषी बनून पुजारीबुवांच्या घरात घुसायला तयार होता. समशेर त्याला तयारी करून देत होता. ज्योतिषी म्हणून सायकलीवर जाऊ शकत होता तो, पण गावात कोणी ओळखली सायकल तर पंचाईत. म्हणून समशेर बरोबर घोड्यावरून स्वारी निघाली. गावाबाहेर समशेर थांबून राहिल नि तोवर दिलदार आपला पराक्रम गाजवून येईल.. "आज तरी काम होऊ दे तुझे.." "तुला इतकी माझी काळजी रे समशेर.." "तुझी नाही, स्वतःची काळजी. नाहीतर अजून काही दिवसांनी अजून नवीन काही.. नाही, अजून नव्या कोणाला तरी पळवून आणायला सांगायचास तू.. गुरुजी झाले.. आता हे दोघे.. पळवून आणायचे पण मारायचे नाही ना