दिलदार कजरी - 11

  • 6.1k
  • 1
  • 2.3k

११ केल्याने वेशांतर गुरूदासपूर तसे मोठे गाव. नदीतीरावर वसलेले, त्यामुळे सुपीक जमिनी, हिरवी शेते आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटून आलेल्या सुबत्तेच्या पाठोपाठ लोकांना मग खुणावू लागते ती कला नि कलाकारी.. दशावतारी नि नौटंकीचा मिलाफ असणारी कला तिथे सादर होई. आणि सर्व पात्रे साकारणारा मेकपमॅन ही त्याच गावचा.. हिंमतलाल. समशेर त्याचे नाव ऐकून होता.. नि मग गुरूदासपुरातून येता येता हाती लागेल तसा एक ज्योतिषी .. कुडमुड्या असेल तर अधिकच उत्तम .. दोघांना उचलून आणायचे.. दिलदारची सक्त ताकीद .. हिंसेच्या बळावर आणून चालणार नाही. प्रेमाने समजावून तर ते येणार नाहीत. समशेरच्या गाठीशी तसा मास्तरांना उचलण्याचा अनुभव होताच.. त्यात ही नवीन भर! - आणि