दिलदार कजरी - 8

  • 7k
  • 2.5k

८. पाऊल पडते पुढे .. रात्रीची वेळ. खरेतर त्यांच्या आयुष्यात दिवस नि रात्र वेगळी काढणे कठीण. एकदा डाका घालायचा ठरला की टोळीत चैतन्य येई. दिवसरात्र न पाहता सारे कामाला लागत. आपापल्या घोड्याला प्रेमाने थोपटत खाऊ घालत. बंदुकीच्या गोळ्या व्यवस्थित भरून ठेवत. आता सरावाने सारे पटापट होत असे. दिलदार दुरून पाहात असे. या सर्वात मेहनत तर खरी. योजना आखणे पण महत्त्वाचे. गावाची निवड करणे, त्यासाठी नीट टेहळणी करून योजना आखणे, सगळ्या धामधुमीत आपली टोळी सुरक्षित ठेवणे, मग लुटालुटीची नीट व्यवस्था लावून देणे.. हे आयुष्य खरेतर खडतर आहे. पण मोहिम फत्ते केली.. गावात एखाद्याला जिवानिशी मारले की टोळीतील सारे कृतकृत्य होत. लहानपणापासून