दिलदार कजरी - 6

  • 6k
  • 1
  • 2.5k

६. पहिले पाऊल पुढील काही दिवस गावात फेऱ्या मारून मारून दिलदार थकला. घनघोर फेऱ्या झाल्या पण गावात कजरी दर्शन झाले नाही. देवळात देवीचे दर्शन होई. नि ती पावेल तर कजरी भेटेल.. कदाचित. विचारात मग्न दिलदारला कसलीच शुद्ध नव्हती आजकाल. समशेर आणि बाकी साथीदार तसे मोहिमा आखण्यात मग्न होते. आणि दिलदार आपल्या दुखऱ्या दिलाची मलमपट्टी करण्यात. येता जाता आता कजरीच्या गावचे पण ओळखीचे होतील की काय.. दिलदार त्या विचाराने अस्वस्थ होई, पण इतर काही न सुचून परत त्या देवळाकडे पुजारी कन्येच्या शोधात जाई. शेवटी काही दिवसांनी कजरी दिसली आणि दिलदारच्या दिलात दिल आले, म्हणजे जिवात जीव आला! थोड्याच दिवसांत मग अजून