दिलदार कजरी - 5

  • 6.1k
  • 2.4k

५. स्वप्नात रंगला तो.. शेजारचे गाव. कजरीचे. दिवालपूर. गाव मोठे. म्हणजे खाऊन पिऊन सुखी. हिरवीगार शेते. पाण्याने भरलेली तळी. देवीचे देऊळ. त्याबाहेर पिंपळाचे मोठे झाड. त्याच्या बाजूचा पिंपळाचा पार. घोड्याच्या टापांचा दूरवरून आवाज येतो. हळूहळू वाढत जातो. पारावारचे गावकरी एकेक करून उठतात. आवाजाच्या दिशेने बघतात. मग धावाधाव सुरू होते. घोडे मातीचा धुरळा उडवत गावात भरधाव शिरतात. ही दिवाणसिंगाची टोळी. दिवालपूर लुटायला आलेली. दिवाणसिंग शेफारलाय हल्ली. त्याचे साथीदार हवेत गोळीबार करतात. गावकरी घाबरून घरात नि बाहेर चिडीचुप शांतता. दिवाणसिंगाची माणसं इकडेतिकडे मोकाट सुटतात. सगळीकडे धूळच धूळ. मग दिवाणसिंग स्वतः देवीच्या देवळामागच्या घरात शिरतो. कजरी त्याच्या नजरेतून सुटलेली नाही. तशी कोणाच्या नजरेतून