४. घेई छंद..! त्या नंतर दिलदारच्या दिलाने एकच आवाज दिला.. 'कजरी कजरी.' कजरी नामात तो गुंगला, गुंतला. ध्यानी मनी स्वप्नी.. कजरी दिसू लागली. रोज सकाळ संध्याकाळ त्या देवळाकडे पाऊले पडू लागली. समशरेसिंगाने लाख समजावले पण दिलदार है कि मानता नहीं.. असे व्हायला लागले. रात्रंदिन तो ती दिसेल याच्या विचारात मग्न बसू लागला. लागले नेत्र ते कजरीतीरी असे काहीतरी. देवळाबाहेर नि देवळाच्या आत, चुकला फकीर मशिदीत सापडावा तसा दिलदारसिंग सापडायला लागला. न राहवून समशेर सांगे, "सरदार, तुम्ही हा नाद सोडा. ज्या गोष्टीला शेवट नाही ती अशी पुढे रेटू नका.." "समशेर, तू माझा एकुलता एक यार, तू पण असे बोलावेस?" "सरदार, हे