भगवान श्रीकृष्ण महान शेतकरी राजा आणि जाणता अभिनेता होता - भाग-१

  • 13.1k
  • 1
  • 6.3k

भगवान श्रीकृष्ण अवघ्या सृष्टीचा सच्चा मित्र होता. तो सर्वांचा मित्र होता. स्त्री-पुरुषांचा, लहान मोठ्यांचा, झाडांचा, जनावरांचा ,पशु, पक्षांचा ,आणि निसर्गाचा मित्र होता . तो पर्यावरणाचा महामित्र होता... जन्म आणि मृत्यूचा सुद्धा तो मित्र होता. तो पांडवांचा जसा मित्र होता तसा कौरवांचा सुद्धा मित्र होता .कौरवां मधील सहदेव कृष्णाचा जवळचा मित्र होता आणि दुसरा होता महाभारतातील युद्धात जिवंत राहिलेला शेवटचा कौरव ...युयूत्सूचा सुद्धा तो मित्र होता. तो राधेचा मित्र होता. तो द्रोपदीचा मित्र होता. तो रुक्मिणीचा मित्र होता. सत्यभामेचा मित्र होता. सत्यभामा आणि रुक्मिणी या त्यांच्या पत्नी होत्या. सत्यभामा ही त्याची लग्नाची पत्नी होती .तर