दिलदार कजरी - 1

  • 10.9k
  • 5.3k

Dr Nitin More १ दिलदार त्याचे नाव दिलदारसिंग! नावाप्रमाणेच दिलदार. खरेतर एखाद्या डाकूला न शोभेल असे नाव त्याचे. दिलदार! त्याच्या जन्माच्यावेळी त्याच्या बापास, संतोकसिंगास, त्याचे पाय पाळण्यात दिसले की काय कोणास ठाऊक, भर जंगलात दिलदारने पहिला ट्यांहा केला. संतोकसिंग खूश झाला. आपल्या डाकू घराण्याचे नाव उज्वल करायला वारस मिळाला म्हणून. संतोकसिंग ठाकूर म्हणजे चंबळमधील सिनियर डाकू. रेप्युटेड म्हणावी अशी दरोडेखोरांची टोळी चालवणारा. त्याच्या क्रूरकर्मांमुळे गावागावातून प्रसिद्धीस पावलेला. नुसत्या नावानेही गावातले लोक चळचळा कापत. संतोकसिंग तसा कर्तृत्ववान. कमी वयात अंगावर टोळीची जबाबदारी येऊन पडली. संतोकसिंगाचा बाप नटवरलालसिंग एका डाक्याच्या वेळी बंदुकीची गोळी लागून गेला. त्याने देह ठेवला तेव्हा संतोक उणापुरा सोळा