मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 1

  • 14.4k
  • 7.3k

आयुष्य म्हणजे नेमकं काय असावं??? कोणी म्हणतं जीवन आणि मृत्यू यांच्यातील द्वंद म्हणजे आयुष्य...!! कोणी बोलतं, अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेऊन त्यांना पूर्णत्वास घेऊन जाणं म्हणजे आयुष्य तर कोणाचं हे मत आहे की अपेक्षा भंग झाला असूनही ज्याला सुख आणि समाधान मिळवता येतं ते आयुष्य....!!! प्रत्येकाची व्याख्या वेगळी...ज्याला जो अनुभव आला, जी समज आली, त्याने तसं रूप दिलं आयुष्याला.... पण मला काय वाटतं माहीत आहे??? मला वाटतं आयुष्य म्हणजे एक पुस्तक, एक कादंबरीच....त्या कादंबरीचं एक एक पान उलटत जावं आणि तसा तसा एक एक धडा समोर यावा अन तसे आयुष्यातले दिवस पालटत जातात....आता ह्या कादंबरीत बऱ्याच ओळी, बरेच पात्र असे