प्रायश्चित्त - 19 - अंतिम भाग

  • 7.5k
  • 3.2k

ही हॉटेल रूमवर पोहोचली तेव्हा दार उघडच होतं. अख्खा रुमभर खेळणी पसरली होती. साईड टेबलवर हॉट चॉकलेटचा रिकामा ग्लास, फळांचा रिकामा डबा होता. बेडभर शंतनू पसरला होता आणि त्याच्या छातीवर श्रीश पालथा झोपला होता. हे दृश्य तिच्या मनात परत एकदा हजारो भावनांचा कल्लोळ उठवून गेलं. घशात बारीकसा हुंदका दाटला. पटकन एक फोटो काढून घ्यावा असंही मनात आलं. काय जाणो शंतनूचं मन परत बदललं आणि गेला सोडून बाळाला तर क्षणभर का होईना पण त्याने प्रेम केलं तुझ्यावर असं सांगायला पुरावा झाला असता. तिनं खरंच ओल्या नजरेनेच एक फोटो काढला. हळूच जाऊन त्या प्रेमाच्या कोषात विरून जावं आपणही ही भावना अनावर होऊन