श्वास असेपर्यंत - भाग ६

  • 7k
  • 2.7k

चित्राच्या बिमारीची बातमी ऐकून मी रडायला लागलो. तेव्हा बबन म्हणाला, " अमर ,ही रडण्याची वेळ नाही. चित्रा तुझी आठवण काढत असल्याने तू लगेच माझ्यासोबत चल, असा तुझ्या आईने मला निरोप घेऊन पाठवला आहे." " सोबतच गावात साथीच्या रोगाची लागण झाल्याने ,गावांत प्रत्येकाच्या घरची परिस्थिती जवळपास सारखीच आहे !!!" आपल्या गावचा नामदेव त्याचा म्हातारा बाप हगवण लागल्याने पार कसातरी झाला होता, आणि मग काही दिवसांनी मरण पावला, बऱ्याच लोकांची प्रकृती जागेवर आली नाही.सरकारी डॉक्टर येऊन तपासणी करतात , काही गोळ्या ,इंजेक्शन देतात आणि चालली जातात. बबन च्या या वाक्याने मनात अजून धास्ती भरली होती. शेवटी मी सरांना हकीकत