श्वास असेपर्यंत - भाग ३

  • 7.3k
  • 4.1k

रस्त्याने आम्ही तीन - चार मित्र चाललो होतो. सर्वांची घरे एकाचं भागाला असल्याने आम्ही सोबत सोबत नेहमी जात असायचो आणि परत सोबतचं येत सुद्धा असायचो.पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, कुठे जाण्यायेण्यामुळे चिकचिक झाली होती. वावरातून येणाऱ्या मजुरांच्या पायाला वावरातील माती लागून ती रस्त्यावर दिसत होती. काही ते मातीचे पेंड जमिनीवर घासून काढत होते.आमच्या मित्रांमध्ये खोडकर म्हणजे कैलास पण सर्व गावात त्याला कैलू म्हणत असायचे. त्याने रमश्या वर ते रस्त्यावर झालेल्या डोबऱ्यातील पाणी उडवले. त्यात रमश्या चा शर्ट आणि गांडीकडून छिद्र लागलेला त्याचा पॅन्ट भरला.