दिवाना दिल खो गया (भाग ९)

  • 8.3k
  • 3.5k

(दोघेही प्रवास करून आल्यामुळे फार थकले होते. त्यामुळे पडल्या पडल्या दोघांची झोप लागली. त्यांना झोपून काही तास उलटले असतील. इतक्यात रात्री कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होते. आवाजाने दोघांची झोपमोड झाली. दोघेही एकत्र दाराकडे धावले. पुढे पाहतात तर काय????) आता पुढे.... सिलूने दरवाजा उघडला तर समोर एक पोलिस उभा होता आणि सगळीकडे धावपळ चालली होती. सिलूला काहीच कळत नव्हते. नक्की काय चाललय ते. तो पोलिसाला काही विचारणारच होता तेवढयात तो पोलिस स्वत:च सिलूला म्हणाला, “तुमच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे आणि ती हवेमुळे सगळीकडे पसरतेय. म्हणून आम्ही ही इमारत पूर्णपणे खाली करत आहोत. कृपया तुमच्या घरात अजून कोण