म्हातारपण - 2 - रंडका

  • 11.2k
  • 3.7k

गावच्या येशीवर निघालो. गावात नेहमीच असणारी तीच वर्दळ होती.. रस्त्याने चालत असताना पाठीमागून येणाऱ्या गाड्याचे हॉर्न वाजत कानावर कर्कश आवाज .. किती तरी वेळ जसेच्या तसेच वाजत होते. मध्येच एखाद्या गल्लीतुन मोटारसायकल येऊन उभी राहायची, त्याने वाजलेल्या हॉर्नमुळे अचानक गाडी अंगावर आल्याचा भास होत असे. त्याने गच्चकण मारलेला ब्रेक .. गाडी अगदी पायाजवळ येऊन थांबली कीं ,,काय कीं अंगावर आली असं वाटायच चला नशीब जीव वाचला. त्याच एक समाधान असे.देवाने शरीर दिल त्यात जीव टाकलं.. शरीर चालू आहे ते त्या देवामुळे.. पांडुरंग !पांडुरंग ! देव कधीही दिसला नाही. तो दिसावं असं खुपवेळा मनाला वाटायचं पण लोक सांगतायत तेच खरं असल