आईपण आणि आई पण...

  • 9.3k
  • 1
  • 2.8k

" आई! माझे केस बांध ना ग." तिने अस्ताव्यस्त पसरलेले आपले केस बेजुला करून, आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत विजूकडे पहिले. "हो."सदा चा डब्बा भरून विजू त्याचा नाश्त्याची तयारी करू लागली. "आई, भावे काकांना सांग ना, 'मला गार्डन मध्ये घेऊन जायला.' "कपाटातली लाल बाहुली, थोडी तुटकी-मुटकी खेळणी आणि आपल्या मेकपचा छोटा किट घेऊन, ती आता भातुकली खेळायला बसली होती.विजू वरती न पाहताच "हो " म्हणाली . "सदा ! तू नाश्ता करून घे, आठवणीने डबा देखील बॅग मध्ये भर रे. मी तिला भरवून घेते. " पोह्यांच्या दोन प्लेट्स भरून विजूने त्यावर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा यथेच्छ शिडकारा केला. थोडीशी बारीक शेव